main |
sidebar
Posted by
Random Thoughts
at
2:22 PM
गुगल ट्रान्स लिटरेशन वापरून मराठीत लिहिता येतंय का ते बघायची पहिलीच वेळ, आणि ते प्रकरण सोप्पं नाही हे लगेचच लक्षात आलं. "लिटरेशन" हा शब्द लिहिताना ज्या काही कसरती कराव्या लागल्या ते माझं मलाच माहिती.
जर मराठीत लिहायचं असेल तर दुसरी कायतरी सोय बघावीच लागेल.
आज खूपच दिवसा-वर्षानी ब्लॉग वरची धूळ झटकली आहे. नाहीतरी आया-बहिणी सोडून कोणी तसाही वाचतच नाही त्यामुळे माझ्या न लिहिण्यानी जगाचं काही नुकसान झालेलं नाही :)
हे लिहिताना एकीकडे व्हिज्युअल स्टुडियो लोड करणे चालू आहे, दुसरीकडे हेडफोन कानात खुपसून विविध भारती ऐकते आहे. काही काही कोपच्यातली गाणी फक्त आणि फक्त विविध भारती वरच ऐकता येतात. आताच ऐकलेल्या महान गाण्याचे बोल होते, "बर्तानोको करलो कल्हाई" ! "गर्ल्स होस्टेल" नावाच्या कोणे एके काळाच्या सिनेमातलं होतं ते गाणं.
आजचा वेळ मी जुने जे ब्लॉग आता वाचत नाही त्यांची लिंक काढून टाकणे, नव्याने वाचायला लागलेल्या ब्लॉग च्या लिंक डकवणे, ही निरर्थक पोस्ट लिहिणे यात सत्कारणी गेला.
1 comments:
Try Baraha...you can save ur posts like u save word files :)
Sorry for English as I m replying from my mobile :P
Happy Blogging
Aparna
Post a Comment